पुणे :- ( दैनिक शिवसंग्राम न्यूज पोर्टल )
दहशतवाद्यांनी सायकलला पसंती दिली आणि बॉम्बस्फोट घडवण्यासाठी सायकलचा वापर व्हायचा, असा अजब तर्क पंतप्रधान मोदींनी लावला होता. तेव्हापासून उत्तर प्रदेश निवडणुकीत सायकलवरून राजकारण तापलंय. काल मतदानाच्या पाचव्या टप्प्यात देखील भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री के. पी. प्रसाद मौर्य यांनी अखिलेश यादव यांच्या सायकल या चिन्हावरून निशाणा साधला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काल पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यावेळी केशव प्रसाद मौर्य यांनी मतदान केलं. त्यानंतर ते बोलत होते. अखिलेश यादव यांची अहंकरामध्ये उंच उडणारी सायकल १० मार्चला बंगालच्या उपसागरात जाऊन पडणार आहे.
त्यांची सायकल आधी सैफईला गेली होती आणि आता ती बंगालच्या उपसागरात जाईल, असं केशव प्रसाद मौर्य म्हणाले. मला विश्वास आहे की सिरथूची जनता कमळ फुलवेल आणि सिरथूच्या मुलाला मोठ्या मताधिक्याने विजयी करेल. भाजप सरकार उत्तर प्रदेशातील २४ कोटी जनतेच्या कल्याणासाठी काम करत आहे. म्हणूनच लोकांनी उत्तर प्रदेशात कमळ फुलवायचे ठरवले आहे, असा विश्वासही केशव प्रसाद मौर्य यांनी व्यक्त केला.