पुणे :- ( दैनिक शिवसंग्राम न्यूज पोर्टल )
दिशा सलियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने मालवणी पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण राणे यांच्यावर सातत्याने दिशा सलियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे. दिशाबद्दल समाजमाध्यमावर चुकीची व बदनामीकारक माहिती देत संभ्रम निर्माण करणे या कृत्याबाबत नारायण राणे यांच्याविरुद्ध तसेच त्यांनी केलेल्या आरोपांना माध्यमांवरून दुजोरा देणारे नितेश राणे व चंद्रकांत पाटील यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करा असे निर्देश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.
रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे की, दिवंगत दिशा सॅलियनची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. तिच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्यावर बलात्कार झालेला नसून ती गरोदर सुद्धा नव्हती हे मालवणी पोलिसांनी राज्य महिला आयोगाला दिलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे.
मृत्यूपश्चात देखील होत असलेल्या आपल्या मुलीच्या बदनामीमुळे व्यथित झालेल्या दिशा सॅलियनच्या आई वडिलांनी या संदर्भात दिशाच्या मृत्यूबाबत खोटी व बदनामीकारक माहिती देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ.नितेश राणे व संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करावी, असं चाकणकर यांनी म्हटलं आहे.