पुणे :- ( दैनिक शिवसंग्राम न्यूज पोर्टल )
सोशल – मिडीयाच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका उपनगरातील तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी संशयीत तरुण समर्थ प्रसाद गवळी (वय २२) आणि त्याचे वडील प्रसाद गवळी ( रा. गवळी गल्ली) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती नुसार, शहरातील एका उपनगरात कुटुंबियांसह पिडीत तरुणी रहात आहे. संशयित समर्थ हा गवळी गल्ली परिसरात रहात असून त्याची आणि पिडीत तरुणीची इन्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती.
संशयीताने ओळख वाढवून पिडीतेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून शहरातील विविध लॉजवर त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. १६ एप्रिल २०२१ ते २६ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. दरम्यानच्या कालावधित पिडीत तरूणीने अनेळवेळा गवळीकडे लग्नासाठी विचारणा केली होती. संशयीत समर्थ गवळी हा लग्न करण्यास टाळाटाळ करु लागल्याने पिडीतेने घडलेला प्रकार समर्थ याच्या वडिलांना सांगितला. वडील प्रसाद गवळी यांनीही दोघांचे लग्न करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही लग्नास टाळाटाळ होतच राहिली. गेली अनेक महिने उलटले तरी लग्नाबाबत टाळाटाळ होत असल्याने अखेर पीडितेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत संशयीताच्या विरोधात फिर्याद दिली आहे.