Monday, December 12, 2022
No menu items!
Homeक्राईमसंतापजनक ! म्युझिक टीचरचा विद्यार्थिनीवर रेप

संतापजनक ! म्युझिक टीचरचा विद्यार्थिनीवर रेप

पुणे :- ( दैनिक शिवसंग्राम न्यूज पोर्टल )

हरियाणाच्या फरीदाबादमध्ये एका म्युझिक टीचरला आपल्या विद्यार्थिनीचा रेप केल्याप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांच्या माहिती नुसार, म्युझिक टीचर महिलेच्या घरी जाऊन तिला म्युझिक शिकवत होता. यावेळी घरी महिलेचा पती नसायचा. म्युझिक शिकवताना महिलेसोबत म्युझिक टीचरने जवळीक साधली आणि तिचे अश्लील व्हिडीओ-फोटो काढले. अश्लील व्हिडीओ बनवून महिलेला ब्लॅकमेल करून म्युझिक टीचरने तिच्यावर रेप करणं सुरू केलं. इतकंच नाही तर म्युझिक टीचरने महिलेच्या एका मैत्रिणीलाही तिचे व्हिडीओ आणि फोटो पाठवले.

अखेर वैतागलेल्या महिलेने हिंमत एकवटून महिला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेला सगळा प्रकार सांगितला. यावेळी महिला घाबरलेली होती. त्यानंतर तिची काउन्सेलिंग करण्यात आली. पोलिसांसाठी आरोपीला पकडणं एक मोठं आव्हान होतं. कारण तो फरीदाबादमध्ये केवळ अर्ध्या तासांसाठी येत होता. आरोपी म्युझिक टीचरने पीडित महिलेला ती महिला पोलीस स्टेशनमध्ये असतानाही फोन करून त्रास दिला. यादरम्यान पोलिसांनी त्याचं मोबाइल लोकेशन ट्रेस केलं आणि त्याला अटक केली.

आरोपीची चौकशी करत असताना त्याच्या फोनमध्ये इतरही अनेक महिलांचे फोटो आणि मोबाइल नंबर मिळाले. पोलिसांना संशय आहे की, आणखीही काही महिलांसोबत या आरोपीने बलात्कार केला असेल आणि त्यांना ब्लॅकमेल केलं असेल. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments